Anuradha Vipat
सफरचंद खाताना ते सालीसकट खाणे आरोग्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर मानले जाते.
सफरचंदाच्या सालेमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करते.
सालेमध्ये 'क्वेरसेटिन' नावाचे अँटी-ऑक्सिडंट असते, जे हृदयाचे रक्षण करते.
सफरचंदाच्या सालेमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए चे प्रमाण गराच्या तुलनेत जास्त असते.
सालेमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक कमी लागते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
आजकाल सफरचंदावर मेण लावले जाते किंवा कीटकनाशकांचा वापर केला जातो.
सफरचंद खाण्यापूर्वी ते कोमट पाण्यात थोडे मीठ किंवा विनेगर टाकून स्वच्छ धुवून घ्यावे.