sandeep Shirguppe
शरीरासाठी शेवग्याच्या शेंगा खूप फायदेशीर असतात, याचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक आजारांपासून आराम मिळतो.
या शेंगांची भाजी अनेकजण बनवून खातात. या भाजीला औषध तसेच वैद्यक शास्त्रात खूप महत्व आहे.
अमेरिकन जर्नल ऑफ न्यूरोसायन्सच्या अभ्यासानुसार, शेवगा पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खूप चांगली आहे.
शेवग्यामध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी, लैंगिक पौरुषता आणि पुरुषांची कामवासना वाढवण्याची क्षमता असते.
आयुर्वेदामध्ये शेवग्याच्या फुलांना खूप महत्त्व आहे. कारण ते पुरुषांच्या शरीरात शुक्राणूंची संख्या आणि प्रजनन क्षमता सुधारते.
हृदयाच्या स्वास्थ्यासाठी शेवगा शेंगा आणि त्याची भाजी खूप फायदेशीर ठरू शकते.
शेवगामध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याची क्षमता देखील असते.
पोटदुखी किंवा पोटाशी संबंधित समस्या असेल तर या शेगांचे सेवन करावे.