sandeep Shirguppe
गुळवेल हे नाव अनेकांसाठी नवे असेल. पण या वेलीचे अनेक फायदे आहेत. गुळवेलला गुडूची असेही म्हणतात.
गुळवेल ताप, डेंग्यू, चिकनगुनिया, संधिवात, व्हायरल फिव्हर, खोकला, सर्दी, ऑटोइम्यून डिसीज, डायबेटिस इत्यादींवर प्रभावी ठरते.
ग्लुकोसाइड, फॉस्फोरस, कॉपर, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम यासारखे खनिजे गुळवेलमध्ये आहेत.
डेंग्यूचा ताप कमी करण्यासाठी गुळवेल रामबाण उपाय आहे. या औषधाच्या सेवनामुळे रुग्णाची प्रकृती सुधारण्यास मदत मिळते.
ताप उतरवणे, हाडांच्या वेदना कमी करणे यासह कित्येक शारीरिक त्रासातून गुळवेलीमुळे आपली सुटका होते.
आजारपणामध्ये प्रत्येकाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर वाईट परिणाम होतो. गुळवेलीमधील इम्युनोमॉड्युलेटरी गुणधर्मामुळे रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.
गुळवेल पावडर - सकाळी फक्त १ चमचा पावडर गरम पाण्यासोबत/मधाबरोबर घ्या.
आपण दररोज सकाळी जेवणाच्या १ तास आधी १० मिली कोमट पाण्यात घालून हा रस पिऊ शकता.