Anuradha Vipat
बर्फाच्या पाण्यात तोंड किंवा चेहरा बुडवल्याने त्वचेला झटपट ताजेपणा मिळतो आणि अनेक सौंदर्यविषयक फायदे होतात.
चेहऱ्यावर किंवा डोळ्यांखाली आलेली सूज थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावल्याने लगेच कमी होते.
बर्फाच्या संपर्कामुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचा फ्रेश दिसते.
थंड पाण्यामुळे त्वचेची मोठी झालेली छिद्रे तात्पुरती आकुंचन पावतात आणि त्वचा घट्ट वाटते.
मेकअप करण्यापूर्वी हा उपाय केल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होते आणि मेकअप दीर्घकाळ सेट राहतो.
थंड पाणी चेहऱ्याला लागताच 'व्हॅगस नर्व्ह' उत्तेजित होते, ज्यामुळे मानसिक तणाव, चिंता कमी होऊन मन शांत होते.
उन्हामुळे किंवा ॲक्नेमुळे चेहऱ्यावर आलेली लालसरपणा आणि जळजळ कमी करण्यास थंडावा मदत करतो.