Cotton Seed Oil : सरकीची पेंडच नाही तर तेल ही उपयुक्त

Team Agrowon

अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये स्वयंपाकघरात सरकीच्या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. सरकीचे तेल हे प्रामुख्याने तळण्यासाठी वापरले जाते.

Cotton Seed Oil | Agrowon

सरकी तेलात तळलेले अन्नपदार्थ अधिक काळासाठी ताजे राहून त्याचा स्वाद, चव आणि खमंगपणा अबाधित ठेवतात.

Cotton Seed Oil | Agrowon

मात्र भारतात सरकीचे उत्पादन इतर तेलबियांपेक्षा अधिक असूनही सरकीच्या तेलाचे उत्पादन आणि वापराबाबत उदासीनता दिसून येते.

Cotton Seed Oil | Agrowon

सरकी ही बहुगुणी आहे. तिचा वापर कापूस बियाणे म्हणून केला जातो. कापसापासून वस्त्रनिर्मिती होतेच. परंतु त्याच्या बीवर म्हणजे सरकीवर प्रक्रिया करून यापासून मोठ्या प्रमाणात पेंड तयार होते. त्याचा किफायतशीर पशुखाद्य म्हणून वापर होतो.

Cotton Seed Oil | Agrowon

दुग्ध व्यवसायाबरोबरच कुक्कुटपालन आणि मत्स्यबीज व्यवसायात देखील यापासून पशुखाद्य म्हणून वापर होऊ शकतो. याच प्रक्रियेतून कॉटन लिंटर्स, हल्ल्स हे किमती उपपदार्थ देखील तयार होत असल्याने त्यातून मूल्यवर्धन साधता येते.

Cotton Seed Oil | Agrowon

भारतात कापूस लागवड केवळ वस्त्रोद्योग विकासासाठी केली जाते. सरकीचा वापर प्रामुख्याने पेंड उत्पादनासाठी. मात्र खाद्यतेलाकडे दुर्लक्ष केले जाते.

Cotton Seed Oil | Agrowon

अमेरिकेत १८०० पासून कापूस बियाण्यांच्या तेलाला ‘मेरिकेचे मूळ वनस्पती तेल’ हा दर्जा मिळाला आहे. तेथे सॅलड ड्रेसिंगसाठी देखील या तेलाचा चांगला वापर केला जातो.

Cotton Seed Oil | Agrowon