Anuradha Vipat
गाजर हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी 'सुपरफूड' मानले जाते.
जेव्हा आपण गाजर खातो, तेव्हा आपले शरीर त्याचे रूपांतर 'व्हिटॅमिन ए' मध्ये करते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे जीवनसत्व आहे.
व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांना कमी प्रकाशात किंवा अंधारात पाहण्याची क्षमता मिळते.
गाजरातील पोषक घटक रेटिना निरोगी ठेवण्यास मदत करतात.
गाजरामध्ये हे दोन महत्त्वाचे अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ते डोळ्यांचे सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करतात
नियमित गाजर खाल्ल्याने डोळ्यातील ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे डोळे कोरडे पडणे यांसारख्या समस्या कमी होतात.
गाजर कच्चे खाण्यापेक्षा थोडे शिजवून किंवा वाफवून खाल्ल्यास त्यातील बीटा-कॅरोटीन शरीर अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकते.