Bhagar Benefits : फक्त उपवासालाच नाही तर रोज खाल्ली पाहीजे भगर ; इतके आहेत फायदे

Team Agrowon

भगर पचायला हलकी असते. भगर खाल्ल्याने बद्धकोष्टतेचा त्रास असेल तर तो दूर होतो.

Bhagar Benefits | agrowon

आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पोट भरल्याची भावना सुद्धा लवकर येते आणि जास्त वेळेसाठी टिकून राहते. या कारणामुळे वजन कमी करायचे असेल तर भगर हा एक चांगला पर्याय आहे.

Bhagar Benefits | agrowon

भगर हे लो ग्लायसेमीक इंडेक्स अन्न प्रकारात मोडते. कमी  ग्लायसेमीक इंडेक्स असणारे अन्न रक्तातील अतिरिक्त  साखरेचे प्रमाण रोखण्यास मदत करते.

Bhagar Benefits | agrowon

म्हणून मधुमेह असणाऱ्या लोकांना या प्रकारचे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. म्हणून मधुमेही रुग्णांसाठी भगर फायदेशिर आहे.

Bhagar Benefits | agrowon

ग्लुटेनयुक्त अन्न खाल्ल्याने काही लोकांना पोटात दुखणे, अपचन होणे यासारखे त्रास होतात अशा लोकांसाठी भगर हे पूर्णपणे ग्लुटेन फ्री अन्न आहे.

Bhagar Benefits | agrowon

भगरीत लोह जास्त प्रमाणात असते. साधारणत १०० ग्रॅम भगरीतून १८.५ मिलीग्राम लोह मिळते. याशिवाय जीवनसत्व अ, क, ई आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. 

Bhagar Benefits | agrowon

हाडांची वाढ व आरोग्य राखण्यासाठी कॅल्शियम उपयोगी आहे. भगरीमध्ये कॅल्शिअम असल्यामुळे लहान मुलांना तसेच वृद्धांना भगर जेवणातून देणे फायद्याचे ठरते.

Bhagar Benefits | agrowon

Wheat Storage : वर्षभरासाठी अशी करा गव्हाची साठवण ; लागणार नाही कीड

आणखी पाहा...