Wheat Storage : वर्षभरासाठी अशी करा गव्हाची साठवण ; लागणार नाही कीड

Team Agrowon

गहू साठविण्यासाठी ओलावा, उंदीर, पक्षी आणि अस्वच्छतेपासून मुक्‍त अशा सुरक्षित जागेची निवड करावी.

Wheat Storage | Agrowon

साठवण्यासाठी धातूच्या पत्र्यापासून अथवा सिमेंटपासून बनवलेल्या सुधारित कोठींचा वापर करावा.

Wheat Storage | Agrowon

पोती स्वच्छ साफ करूनच त्यात धान्य भरावे. पोती लाकडी फळ्या अथवा पॉलिथिनच्या चादरीवर ठेवावीत.

Wheat Storage | Agrowon

साठवणुकीच्या काळात गव्हामध्ये किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यात ओलाव्याचे प्रमाण १० टक्के इतके कमी असणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी मळणीनंतर गव्हास तीन ते चार दिवस चांगले ऊन देऊन ओलाव्याते प्रमाण कमी करावी. ऊन दिल्यावर गहू थंड होऊ द्यावा. त्यानंतर योग्य पद्धतीने साठवण करावी.

Wheat Storage | Agrowon

पुढील वर्षी पेरणीसाठी मागील वर्षीचा गहू बियाणे म्हणून वापरायचा असल्यास गहू बियाण्यास प्रति किलो १० ग्रॅम वेखंड भुकटी याप्रमाणे बीजप्रक्रिया अवश्‍य करावी.

Wheat Storage | Agrowon

मळून तयार झालेला खपली गहू मोठ्या चाळणीवर टाकून त्यातील बाहेर आलेले गहू व काडीकचरा वेगळा करावा. यामुळे उत्पादित मालाला चांगला दर मिळण्यास मदत होते.

Wheat Storage | Agrowon

तयार केलेली खपली उन्हात चांगली वाळवून पोत्यात अगर कोठीत ठेवावी. घरी खाण्यासाठी लागेल तशी भरडून आणावी. भरडताना जास्त तुकडे होऊ नयेत याची काळजी घ्यावी.

Wheat Storage | Agrowon

Palak Cultivation : उन्हाळ्यात करा कमी दिवसात येणाऱ्या पालक ची लागवड

आणखी पाहा...