Aloe Vera Gel Overnight : रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचे जेल लावताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी माहीत असायलाच हव्यात!

Anuradha Vipat

कोरफडीचे जेल

चेहऱ्याला रात्रभर कोरफडीचे जेल लावणे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते, कारण रात्रीच्या वेळी त्वचा स्वतःला रिपेअर करण्याचे काम करत असते.

Aloe Vera Gel Overnight | agrowon

त्वचेला सखोल ओलावा

एलोवेरामध्ये ९९% पाणी असते. ते रात्रभर त्वचेमध्ये शोषले गेल्याने त्वचा मऊ, सतेज आणि हायड्रेटेड राहते.

Aloe Vera Gel Overnight | agrowon

पिंपल्स आणि डाग

यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. रात्री हे जेल लावल्याने चेहऱ्यावरील मुरुम आणि त्यांचे डाग हळूहळू कमी होण्यास मदत होते.

Aloe Vera Gel Overnight | agrowon

अँटी-एजिंग

कोरफडीमध्ये व्हिटॅमिन 'सी' आणि 'ई' भरपूर प्रमाणात असते. हे घटक त्वचेतील कोलेजन वाढवून सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करतात.

Aloe Vera Gel Overnight | Agrowon

त्वचेची जळजळ

जर तुमची त्वचा उन्हामुळे डॅमेज झाली असेल किंवा रॅशेस आले असतील, तर रात्रभर एलोवेरा जेल लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि जळजळ थांबते.

Aloe Vera Gel Overnight | agrowon

त्वचा कोरडी पडू शकते

काही लोकांच्या बाबतीत, नैसर्गिक कोरफडीचे जेल रात्रभर ठेवल्यास ते सुकल्यानंतर त्वचेतील ओलावा खेचून घेते, ज्यामुळे सकाळी त्वचा जास्त ड्राय वाटू शकते.

Aloe Vera Gel Overnight | Agrowon

ॲलर्जी किंवा जळजळ

जर तुमची त्वचा अतिसंवेदनशील असेल, तर रात्रभर जेल ठेवल्याने खाज सुटणे, पुरळ येणे किंवा त्वचा लाल होणे अशा समस्या होऊ शकतात.

Aloe Vera Gel Overnight | agrowon

Horoscope 6 October 2026 : कामाच्या ठिकाणी स्थिती समाधानकारक राहील, मोठी जबाबदारी येऊ शकते

Horoscope 6 October 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...