sandeep Shirguppe
बेलाचे फळ बऱ्याच जणांना ऐकून माहीत आहे. धार्मिक विधीमध्ये याचा वापर केला जातो.
बेल फळ हे आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले असते. म्हणूनच विविध आयुर्वेदिक औषधात बेल फळाचा उपयोग केला जातो.
बेल हे असे फळ आहे की ते खाल्ल्याने आपल्या शरिराला अनेक फायदे आणि आजार दूर होतात.
बेलाच्या फळांचा हंगाम हा उन्हाळ्यात येतो.तसेच या फळांचा रस प्यायल्याने तर तुमच्या पोटाच्या समस्याही दूर होतात.
हृदयाशी संबंधित रुग्णांनी बेलाच्या फळाचे सेवन करावे. याचा तुमच्या हृदयाला खूप फायदा होतो.
ज्यांना अशक्तपणाची समस्या, लाल रक्तपेशींची कमतरता किंवा त्यांच्या शरीरात लोहाची कमतरता असलेल्यांनाही बेल फळ खावे.
मूळव्याध ग्रस्त लोकांसाठी बेलाचे फळ खाने खूप फायदेशीर आहे. या फळामध्ये फायबर आढळते जे मूळव्याधांवर खूप फायदेशीर आहे.
डोळे निरोगी ठेवण्यासाठी बेलाचे फळ सर्वात फायदेशीर आहे, कारण या फळामध्ये जीवनसत्त्वे आढळतात ज्यामुळे दृष्टी सुधारते.
कॉलरा हा जीवाणूजन्य संसर्ग आहे. या संसर्गामुळे जुलाब आणि उलट्या होतात. हे टाळण्यासाठी, या फळाचे खूप महत्त्व आहे.a
बेलाच्या फळामध्ये व्हिटॅमिन सी असते आणि व्हिटॅमिन सीचे सेवन केल्याने मायग्रेनच्या रुग्णांना खूप आराम मिळतो.