Team Agrowon
महाशिवरात्रीला बेलपानाला विशेष महत्व असते. महाशिवरात्रीला महादेवाला बेलपत्र वाहतात. बेलपान विविध शारिरीक समस्यांवर उपयोगी आहे.
ताप, थंडी आणि अस्थमा या विकारांमध्ये कोठा हलका करण्यासाठी बेलाच्या पानांचा ताजा रस मधासोबत घेतात.
डोळ्याचे विकार, ताप, श्वसनमार्गाला सूज येणे आणि शरीरावरच्या जखमांवरील उपचारात बेलाच्या पानांचे गरम पोटीस बांधतात.
भाजलेल्या पानांचा रस काढून तो दिवसातून दोनदा याप्रमाणे २१ दिवस घेतला तर पित्तदोष कमी होतो
अतिसार, उलट्या, तोंड कोरडे पडणे यांसारख्या तक्रारींवर बेलाची फुले उपयोगी असतात.
पिकलेल्या बेलफळाचा लगदा दुधात मिसळून अंघोळीपूर्वी सर्वांगाला लावल्यास शरीराला थंडावा मिळतो. डोळ्यांनाही ताजेपणा जाणवतो.
अधूनमधून सतत येणारा ताप आणि प्रचंड औदासिन्य, मानसिक हतबलता यांसारख्या मनोविकारांमध्ये बेलाच्या झाडाच्या मुळांचा उपयोग केला जातो. मात्र हे सर्व उपाय तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Wood Apple Benefits : महाशिवरात्रीला विशेष मान असणारे आंबट, गोड कवठ आरोग्यासाठी वरदान