Mahesh Gaikwad
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकालाच चांगले आरोग्य आणि फिटनेस असावा, असे वाटते. यासाठी अनेकजण जिममध्ये वर्कआऊटसाठी जातात.
तुम्ही सुध्दा फिटनेससाठी जिमला जाण्याचा विचार करत असाल, तर जिम सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहिती असायला हव्या.
जिमला जाण्याचा तुमचा उद्देश वजन कमी करणे, मसल्स वाढवणे की फक्त फिट राहणे हे आधी ठरवा.
जिम करताना अनुभवी आणि तज्ज्ञ ट्रेनरच्या मार्गदर्शनखाली व्यायामाला सुरूवात करा. चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यास तुम्हाला इजा होण्याची शक्यता असते.
जिममध्ये व्यायाम सुरू करण्याआधी हलका वॉर्म-अप व बॉडी स्ट्रेचिंग करा, यामुळे शरीर सैल होते व स्नायूंना इजा होत नाही.
जिम सुरू केल्यावर सुरूवातीलाच अधिक वजन उचलण्याचा प्रयत्न करू नका. सुरूवातीला हलकी वजने आणि मशिन्सच्या साहाय्याने व्यायामाला सुरूवात करा.
जिममध्ये व्यायाम करताना आरामदायी कपडे आणि बूट वापरणे आवश्यक आहे.
व्यायामानंतर शरीराला भरपूर विश्रांती हवी असते. रोज किमान ७-८ तास झोप आवश्यक आहे.