Team Agrowon
जनावरांची धार काढल्यानंतर बाहेरून दुधात अनेक सुक्ष्मजंतूंचा शिरकाव होत असतो.
दूध काढल्यानंतर ते दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण केंद्र, दूध संघ ते ते दूध प्रक्रिया केंद्र या सर्व मार्गाने दूध प्रक्रिया केंद्रावर येत असते.
हा पूर्ण कालावधी हा ४ ते ६ तासांचा असतो. या काळात दुधातील जीवाणूंच्या (bacteria) संख्येत वाढ होऊन दुधाची प्रत कमी होते.
दुधाचे संकलन, प्रक्रिया आणि विक्री या दुग्धव्यवसायातील महत्त्वाच्या तीन पायऱ्या आहेत.
आपल्याकडे गायी-म्हशींचे दूध दिवसातून दोन वेळेस काढले जाते. त्यामुळे दुधाचे संकलन दिवसातून दोन वेळा झाले पाहिजे.
दुधाचे दर हे दुधातील स्निग्धांश आणि स्निग्धांशविरहीत घटक यांवर अवलंबून असतात.
धार काढताना कितीही स्वच्छता (clean) ठेवली तरी, काही प्रमाणात दुधात जीवाणू येत असतात. आपल्या देशातील उष्ण दमट वातावरणामुळे दुधातील जीवाणूंची संख्या झपाट्याने वाढत असते.
आपल्याकडे दुधाचे उत्पादन हे बहुतांश ग्रामीण भागात होत असते. वाहतुकीमुळे या दुधाची प्रत खालावण्याची शक्यता अधिक असते. या सर्व कारणामुळे दुधाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याची गरज असते.