Anuradha Vipat
बीटरूटमध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते जे त्वचेला नैसर्गिक गुलाबी चमक देते.
घरच्या घरी केमिकल-मुक्त बीटरूट क्रीम बनवण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे आहे.
बीटरूट रस, कोरफड जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, बदाम तेल किंवा गुलाब पाणी.
बीट स्वच्छ धुवून, सोलून किसून घ्या. किसलेल्या बीटला गाळणीने किंवा सुती कापडाने पिळून त्याचा शुद्ध रस काढा.
एका काचेच्या बाऊलमध्ये कोरफड जेल घ्या. त्यात २ चमचे बीटचा रस टाकून चांगले फेटा.
आता यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेल आणि बदाम तेल किंवा गुलाब पाणी टाकून पुन्हा एकदा नीट मिक्स करा.
हे मिश्रण जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत हलवा. तयार झालेली क्रीम एका स्वच्छ काचेच्या डबीत भरून ठेवा.