Healthy Soup : फिटनेस आणि चव एकत्र! वजन आटोक्यात ठेवण्यासाठी रोजच्या आहारात ठेवा हे ५ सूप प्रकार

Anuradha Vipat

अत्यंत फायदेशीर

हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी सूप पिणे अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Healthy Soup | agrowon

पोषक तत्त्वे

सूपमुळे शरीराला भरपूर पोषक तत्त्वे मिळतात, पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

Healthy Soup | Agrowon

टोमॅटो सूप

हे सूप रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्वचेसाठी उत्तम मानले जाते. यात कॅलरी कमी असल्याने वजन कमी करणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे.

Healthy Soup | Agrowon

व्हेजिटेबल क्लिअर सूप

या सूपमधून शरीराला भरपूर फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स मिळतात. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि आजारपणातून उठल्यावर शरीराला ताकद देण्यासाठी हे सूप सर्वोत्तम आहे.

Healthy Soup | Agrowon

लसूण आणि पालकाचे सूप

हे सूप शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. लसणामुळे सर्दी, खोकला आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

Healthy Soup | Agrowon

डाळींचे सूप / वरण सूप

डाळींमध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती किंवा जिम करणाऱ्यांसाठी हे प्रोटीनयुक्त सूप स्नायू बळकट करण्यास मदत करते.

Healthy Soup | agrowon

चिकन सूप

सर्दी-खोकल्यासाठी हे सूप सर्वोत्तम घरगुती औषध मानले जाते. हे सांधेदुखी कमी करते आणि शरीराला झटपट ऊर्जा देते.

Healthy Soup | agrowon

School Tiffin Ideas : लहान मुलांसाठी 'हे' सोपे आणि निरोगी टिफिन पर्याय नक्की ट्राय करा

School Tiffin Ideas | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...