Anuradha Vipat
आजकाल पुरुषांमध्ये स्टायलिश आणि दाट दाढी राखण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
दाढी आकर्षक आणि निरोगी ठेवण्यासाठी केवळ ती वाढवणे पुरेसे नसून, तिची नियमित स्वच्छता, ट्रिमिंग आणि योग्य पोषण करणे अत्यंत आवश्यक असते.
चेहऱ्यावरील त्वचेचे छिद्र बंद होऊ नयेत आणि धूलिकण साफ व्हावेत म्हणून आठवड्यातून २ ते ३ वेळा बिअर्ड शॅम्पूने दाढी स्वच्छ धुवा.
दाढी धुण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. जास्त गरम पाण्यामुळे केसांचे नैसर्गिक तेल नष्ट होते.
दाढी धुऊन झाल्यावर ती हलकी सुकवून घ्या आणि बिअर्ड ऑइलचे काही थेंब हातावर घेऊन दाढीच्या मुळांपर्यंत मसाज करा.
जर तुमची त्वचा जास्त कोरडी असेल, तर तुम्ही बिअर्ड बाम देखील वापरू शकता, जो दाढीला योग्य आकारात ठेवण्यास मदत करतो.
दाढीचा आकार खराब होऊ नये म्हणून दर २ ते ४ आठवड्यांनी ट्रिमर किंवा कात्रीच्या साहाय्याने वाढलेले अस्ताव्यस्त केस ट्रिम करा.