Pesticide Selection : रासायनिक किडनाशकांची निवड करताना ही काळजी नक्की घ्या

Team Agrowon

पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे कीड-रोगांचा प्रादुर्भाव.

Pesticide Selection | Agrowon

बहुतांश सर्व कीटकनाशके कमी अधिक प्रमाणात विषारी असतात. एका मात्रेनंतर माणूस, पाळीव प्राणी आणि सजीवांसाठी धोकादायक ठरतात.

Pesticide Selection | Agrowon

किडीची अचूक ओळख पटवून, त्यांच्या प्रकारानुसार योग्य कीडनाशकाची निवड करावी.

Pesticide Selection | Agrowon

पिकावरील रोग नेमका कशामुळे झाला असावा, याची लक्षणावर खात्री करावी. रोग बुरशीजन्य, कवकजन्य, जिवाणूजन्य किंवा विषाणूजन्य असू शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी योग्य त्या बुरशीनाशक, जिवाणूनाशक यांची निवड करावी.

Pesticide Selection | Agrowon

सुरक्षित मिश्रणाची (उदा. पाण्यात मिसळणारे गोळीदार कीडनाशक) किंवा सुरक्षित वेष्टणाची (उदा. लहान पुड्या इ.) यांची निवड करावी. म्हणजे कीडनाशकांची हाताळणी कमी होईल.

Pesticide Selection | Agrowon

आपण वापरत असलेले रसायन नेमके कोणत्या पद्धतीने काम करते, याची माहिती घ्यावी. (उदा. आंतरप्रवाही कीडनाशक, पोटविष, गवताची मुळे नष्ट करण्यासाठी ट्रान्सलोकेटेड तणनाशक इ.)

Pesticide Selection | Agrowon

एकाच प्रकारच्या कीडनाशकांचा वापर करू नये. त्या ऐवजी आलटून पालटून फवारणीमध्ये रसायनातील कार्यकारी घटक वेळोवेळी बदलला जाईल, याची काळजी घ्यावी. म्हणजे किडीमध्ये प्रतिकारकता विकसित होणार नाही.

Pesticide Selection | Agrowon

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी योजनेत मोठे बदल, पाहा काय आहेत बदल...

आणखी पाहा...