Animal Vaccination : जनावरांना लसीकरण करण्यापुर्वी ही काळजी नक्की घ्या

Team Agrowon

मोठ्या जनावरांमध्ये घटसर्प, फऱ्या, फाशी आणि सांसर्गिक गर्भपात या आजारांविरुद्ध तर शेळ्या-मेंढ्यामध्ये पीपीआर, आंत्रविषार, देवी आणि घटसर्प या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे ठरते.

Animal Vaccination | Agrowon

आजाराची बाधा होण्यापूर्वी लसीकरण करणे गरजेचे आहे. कारण लस टोचल्यानंतर जनावरांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यास किमान १५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे आजाराची बाधा झाल्यानंतर किंवा साथ आल्यानंतर लसीकरण करणे फायद्याचे ठरत नाही.

Animal Vaccination | Agrowon

लसीकरण करण्यापूर्वी सर्व जनावरांना एक आठवडा आधी जंतनिर्मूलनाचे औषध दिले पाहिजे. यासोबतच जनावरांच्या शरीरावरील तसेच गोठ्यातील गोचीड, गोमाशी यांचाही बंदोबस्त करावा.

Animal Vaccination | Agrowon

जनावरांना आहारातून क्षार मिश्रणांचा व जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा. यामुळे जनावरांना टोचलेल्या लसीमुळे रोगप्रतिकारशक्ती निर्माण होऊन चांगले परिणाम होतात.

Animal Vaccination | Agrowon

लसीकरणासाठी नेहमी नामांकित कंपनीची लस निवडावी. कारण या लसीवर योग्य संशोधन आणि चाचण्या झालेल्या असतात.

Animal Vaccination | Agrowon

लस योग्य तापमानात म्हणजे कोल्ड चेनमध्ये ठेवूनच लसीकरण करणे गरजेचे आहे. लसीकरण पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावे.

Animal Vaccination | Agrowon

जनावरांना लागणाऱ्या बहुतांश लसी या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध असतात. काही कारणामुळे लस उपलब्ध नसल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने बाजारातून लस उपलब्ध करून घ्यावी.

Animal Vaccination | Agrowon
आणखी पाहा...