Anuradha Vipat
बाथरूम स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि लिंबू हे सर्वात प्रभावी आणि सोपे घरगुती उपाय आहेत.
हे नैसर्गिक घटक रासायनिक क्लीनरशिवाय बाथरूममधील हट्टी डाग आणि कुबट वास मुळापासून नष्ट करतात.
१ कप व्हिनेगरमध्ये अर्धा कप बेकिंग सोडा आणि पाणी मिसळा. बाथरूमच्या भिंती आणि टाईल्सवर स्प्रे करा, १५ मिनिटांनी घासून धुवून टाका.
टॉयलेट सीटवरील पिवळे डाग घालवण्यासाठी लिंबावर मीठ शिंपडा. ते डागांवर घासून काही वेळ ठेवा आणि नंतर पाण्याने स्वच्छ करा
टॉयलेट आणि बाथरूमची फरशी पुसताना बादलीतील गरम पाण्यात पाव कप व्हिनेगर आणि बेकिंग सोडा घाला.
बाथरूमच्या कोपऱ्यात कापूर उघडा ठेवा किंवा कापूर कोन लटकवून ठेवा, यामुळे कुबट वास येत नाही.
एका छोट्या वाटीत बेकिंग सोडा भरून बाथरूमच्या कोपऱ्यात किंवा खिडकीजवळ ठेवा. तो हवेतील ओलावा आणि दुर्गंधी शोषून घेतो.