Basic Makeup Steps : मेकअप करताना सुरुवातीला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

Anuradha Vipat

अत्यंत महत्त्वाचे

मेकअप करायला सुरुवात करताना चेहऱ्याची योग्य तयारी करणे आणि उत्पादनांचा योग्य क्रम फॉलो करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Basic Makeup Steps | agrowon

पद्धत

योग्य पद्धत न वापरल्यास मेकअप लवकर खराब होऊ शकतो, काळा पडू शकतो किंवा चेहऱ्यावर पॅचेस दिसू शकतात.

Basic Makeup Steps | agrowon

टोनर आणि मॉइश्चरायझर

चेहरा धुवून झाल्यावर टोनर लावा आणि त्यानंतर तुमच्या स्किन टाईपनुसार चांगले मॉइश्चरायझर लावा.

Basic Makeup Steps | agrowon

प्राइमर

मॉइश्चरायझर लावल्यानंतर ५ मिनिटांनी चेहऱ्यावर प्राइमर नक्की लावा. प्राइमर लावल्यामुळे मेकअप जास्त वेळ टिकतो.

Basic Makeup Steps | Agrowon

फाउंडेशन आणि कन्सीलर

चेहऱ्याच्या रंगाशी जुळणारेच फाउंडेशन निवडा, जास्त गोरे दिसण्यासाठी लाईट शेड निवडल्यास मेकअप नंतर काळा पडू शकतो. डोळ्यांखालील काळी वर्तुळे किंवा चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी फाउंडेशननंतर योग्य शेडचे कन्सीलर वापरा.

Basic Makeup Steps | agrowon

ब्लेंडिंग

फाउंडेशन किंवा कन्सीलर बोटांनी पसरवण्याऐवजी ओल्या 'ब्युटी ब्लेंडर' किंवा मेकअप ब्रशचा वापर करा. ब्युटी ब्लेंडर चेहऱ्यावर घासण्याऐवजी हलक्या हाताने डॅब करत मेकअप ब्लेंड करा.

Basic Makeup Steps | Agrowon

मेकअप लूज पावडरने सेट

कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज ट्रान्सल्युसंट पावडर लावून मेकअप व्यवस्थित सेट करा.

Basic Makeup Steps | agrowon

Dry Skin Care Tips : पावसाळ्यात कोरडी त्वचा पडतेय पांढरी? 'हे' घरगुती मलम नक्की ट्राय करा!

Dry Skin Care Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...