Deepak Bhandigare
केळीच्या हिरव्या पानांमध्ये नैसर्गिक स्वरुपात अँटीऑक्सिडंट्स असतात. पानांवर गरम अन्न वाढल्यास त्यातील काही पोषक तत्त्वे हळूहळू अन्नात मिसळतात. यामुळे अन्न अधिक पौष्टिक होण्यास मदत होते.
केळीच्या पानात जेवल्याने पचनक्रिया सुधारते. तसेच शरीराची प्रतिकारकशक्ती मजबूत होऊन विविध आजारांपासून बचाव करण्यासही मदत होऊ शकते.
फेकून देता येणाऱ्या म्हणजेच डिस्पोजेबल प्लेट्सना नैसर्गिक पर्याय म्हणून केळीच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे प्लास्टिक अथवा फोमच्या प्लेट्सचा वापर कमी होईल आणि त्यामुळे होणारे प्रदूषणही कमी करण्यास मदत होते.
केळीच्या पानांमध्ये नैसर्गिक अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. ते अन्नामध्ये असलेले हानिकारक जीवाणू नष्ट करण्यास मदत करतात. यामुळे केळीच्या पानावर जेवल्याने अन्नावाटे होणाऱ्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकतो.
केळीची पाने मोठी असल्याने त्यावर अनेक पदार्थ वाढता येतात. त्यामुळे अनेक ताटांचा वापर न करता एकाच पानावर संपूर्ण जेवण जेवता येते.
केळी पाने वॉटरप्रूफ असल्याने द्रवपदार्थ पानातून झिरपण्याची अथवा ते बाहेर सांडण्याची शक्यता कमी असते.
केळीची पाने जैवविघटनशील असल्याने ती पर्यावरणाला हानी न पोहोचवता नैसर्गिकरित्या सहजपणे विघटित होतात. यामुळे अन्न वाढण्यासाठी या पानांचा वापर हा एक पर्यावरणपूरक पर्याय आहे.
केळीच्या पानावर जेवणे ही एक जुनी परंपरा असून ही आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक मानली जाते. केळीच्या पानामुळे अन्नाची चव वाढते.