Deepak Bhandigare
अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, यामुळे या भाजीचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते
अळूचे अनेक आरोग्यदायी फायदे असून याचा आहारात समावेश केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते
अळूच्या पानांत पोषक तत्वे अधिक असून, त्यात चरबीचे प्रमाण कमी असते. त्यामध्ये फायबर असल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते
अळूची पाने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात, त्यात प्रथिनाचे प्रमाण अधिक आणि चरबीचे प्रमाण कमी असते. यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारात या भाजीचा समावेश करु शकता
अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होऊ शकते
अळूची पानांची भाजी खाल्ल्याने त्वचा उजळण्यासाठी मदत होते. त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहू शकतात
अळूच्या पानांमध्ये ओमेगा-३ सह काही फॅटी ॲसिड असतात, हे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असून रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते
अळूची पाने कधीही कच्ची खाण्याचा प्रयत्न करु नये, कारण त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. अळूची पाने उकडून अथवा पूर्ण शिजवून खाल्ली जातात