Mahesh Gaikwad
केळी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. याच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.
पण बऱ्याचदा आपण केळी खातो आणि त्याची साल फेकून देतो. मात्र, ह्या सालीत असणारे नैसर्गिक गुण त्वचा उजळण्यासाठी मदत करतात.
केळीच्या सालीमध्ये नैसर्गिक तेल असते, जे कोरड्या त्वचेला पोषण देते आणि चेहरा मुलायम आणि टवटवीत करते.
केळीच्या सालीतील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेवरील काळे डाग, पिंपल मार्क्स कमी करतात.
केळीची साल चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळल्यास त्वचा उजळते आणि एकप्रकारचा ग्लो येतो.
केळीच्या सालीमध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म चेहऱ्यावरील मुरुम कमी करून त्वचेला स्वच्छ ठेवतात.
सालीमध्ये व्हिटामिन-सी, ए, पोटॅशिअम, झिंक आणि अँटीॉऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात.
चेहऱ्याच्या ग्लोसाठी केळीची साल हा स्वस्त, नैसर्गिक आणि सोपा उपाय आहे. याच्या नियमित वापराने त्वचा उजळते, डाग कमी होतात.