Swarali Pawar
बागेभोवती ज्वारी, मका किंवा बाजरीच्या काड्यांचे झापे लावा. शक्य असल्यास हिरवे शेडनेट वापरा, यामुळे थंडीचा फटका कमी होतो.
केळीच्या खोडाभोवती ऊसाचे पाचट, सोयाबीन भूसा किंवा सेंद्रिय पदार्थ ठेवा. यामुळे मातीतील ओल टिकून राहते आणि झाडांना थंडीपासून संरक्षण मिळते.
निंदणी, कुळवणी करून बाग स्वच्छ ठेवा. विषाणूग्रस्त झाडे उपटून नष्ट करा, त्यामुळे रोगांचा प्रसार थांबतो.
ठिबक संच नीट चालतोय का ते पाहा. रात्रीच्या वेळी सिंचन करा आणि शिफारस केलेले खत वेळेवर द्या.
तापमान १० अंश सेल्सियसपेक्षा खाली गेल्यास पहाटे धुर करावा. ओला काडीकचरा जाळल्याने बागेतील तापमान वाढते.
८ ते ९ फण्या ठेऊन केळफूल कापा. घड वाढीसाठी २% पोटॅशियम सल्फेटची दोन वेळा फवारणी करा.
घडावर १०० गेज जाडीच्या पॉलीथीन पिशव्या किंवा पांढरे कापड झाका. यामुळे फळ थंडीपासून सुरक्षित राहते आणि रंग व गुणवत्ता सुधारते.
या सर्व उपाय वेळेवर केल्यास थंडीचा त्रास कमी होतो. झाडांची वाढ, घडाचा आकार आणि उत्पादनाची गुणवत्ता उत्कृष्ट मिळते.