Bamboo Shoot : बांबूच्या कोंबाची भाजी खाल्लीये का? ; आरोग्यासाठी आहे खूपच फायदेशीर

Mahesh Gaikwad

बांबूची भाजी

बांबूपासून शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात हे तर सर्वांनाच माहित आहे. तुम्ही कधी बांबूची भाजी खाल्लीये का?

Bamboo Shoot | Agrowon

बांबू कोंब

विविध वस्तू तयार करण्याशिवाय बांबू हे एक खाद्यान्न म्हणूनही उपयोगी आहे. बांबूच्या कोंबापासून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तयार केल्या जातात.

Bamboo Shoot | Agrowon

बांबू खाद्य पदार्थ

बांबूचा कोंब मऊ आणि खायाला रुचकर असतो. अनेक आशियायी पाककृतींमध्ये बांबूच्या कोंबाचा वापरतात.

Bamboo Shoot | Agrowon

बांबू औषधी घटक

बांबूच्या कोंबामध्ये प्रथिने, कर्बोदके, अमिनो ॲसिड आणि तंतुमय घटकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. मात्र, चरबी आणि साखर कमी असते.

Bamboo Shoot | Agrowon

बांबू उत्पादन

ईशान्य भारतातील मणिपूरमध्ये बांबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. याठिकाणच्या खाद्य पदार्थांच्यामध्ये कच्च्या आणि आंबवलेल्या दोन्ही प्रकारात बांबूच्या कोंबांचा वापर केला जातो.

Bamboo Shoot | Agrowon

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करण्यासाठी बांबूचा कोंब हे एक उत्कृष्ट अन्न आहे. यामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते. तसेच तंतूमय घटक जास्त असल्याने जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते.

Bamboo Shoot | Agrowon

कोलॅस्ट्रॉल नियंत्रण

बांबूच्या कोंबांमध्ये फायटोस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते, जे हानिकारक एलडीएल किंवा खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर असते.

Bamboo Shoot | Agrowon

आतड्यांचे आजार

याशिवाय बांबूच्या कोंबाचे सेवन केल्यास आतड्यांच्या समस्या दूर होवून निरोगी राहतात आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होते.

Bamboo Shoot | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....