Anuradha Vipat
रात्रीचे जेवण हे दिवसातील शेवटचे आणि महत्त्वाचे जेवण असते.
रात्रीच्या जेवण आपल्या आरोग्यावर, झोपेवर आणि वजनावर परिणाम करते.
रात्रीचे जेवण कसे असावे काय खावे आणि काय टाळावे याबद्दलच्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत.
रात्रीचे जेवण नेहमी हलके असावे. जड जेवणामुळे पचनक्रिया मंदावते, ॲसिडिटी होते आणि झोपेत अडथळे येतात.
झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी जेवण करावे. यामुळे शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
पोट पूर्ण भरण्याऐवजी थोडे रिकामे ठेवा .जास्त जेवण करणे टाळा.
रात्रीच्या जेवणात पालेभाज्या, उकडलेल्या भाज्या किंवा भाज्यांचे सूप यांचा समावेश करा. त्यामध्ये फायबर आणि पोषण असते.