Anuradha Vipat
हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते, कारण बाजरी उष्ण प्रकृतीची असते.
बऱ्याचदा बाजरीची भाकरी थापताना ती कडेने चिरडते किंवा कडक होते.
उकड काढण्याची सोपी ट्रिक वापरून तुम्ही नवशिक्या असाल तरीही मऊ आणि टम्म फुगणारी भाकरी बनवू शकता.
बाजरीचे पीठ २ वाट्या, पाणी दीड ते २ वाट्या ,मीठ चवीनुसार, कोमट पाणी.
पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा. त्यात थोडे मीठ घाला. त्यात १ वाटी बाजरीचे पीठ घालून चमच्याने पटापट मिक्स करा. गॅस बंद करून पातेल्यावर २ मिनिटे झाकण ठेवून द्या
उकड गरम असतानाच त्यात थोडे साधे किंवा कोमट पाणी शिंपडून हाताने पीठ चांगले एकजीव मळा.
परातीमध्ये पिठाचा गोळा ठेवून एका हाताने किंवा दोन्ही हातांच्या बोटांनी गोलाकार फिरवत भाकरी हलक्या हाताने थापून घ्या. भाकरी तव्यावर टाकल्याबरोबर लगेच सगळीकडे पाणी लावा. दुसरी बाजू व्यवस्थित पूर्ण भाजली गेल्यानंतर भाकरी पुन्हा उलटवा.