Bajari Production : देशातील पाच राज्यातील बाजरी उत्पादन ७५ टक्क्यांवर; महाराष्ट्राचा नंबर कितवा?

Aslam Abdul Shanedivan

जनावरांसाठी वैरण

बाजरी प्रामुख्याने विकसनशील देशांमध्ये पिकवली जाते. ती खाण्याबरोबर जनावरांसाठी वैरण(चारा) म्हणून वापरली जाते. पण भारतात सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं आणि महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो? त्याबाबत ही माहिती...

Bajari Production | Agrowon

उत्तम हवामान

देशात राजस्थानमध्ये बाजरीची लागवड करण्यासाठी माती आणि हवामान उत्तम मानले जाते. सर्वाधिक बाजरीची लागवड ही राजस्थानमध्ये केली जाते.

Bajari Production | Agrowon

सर्वाधित उत्पादन

राजस्थानमध्ये बाजरीचे सर्वाधित उत्पादन होते. राजस्थानचा वाटा २८.०६ टक्के असून तो इतर राज्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे बाजरी उत्पादनात राजस्थान पहिला क्रमांक लागतो.

Bajari Production | Agrowon

कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर

भारतात बाजरी मोठ्या प्रमाणात कर्नाटकातही पिकवली जाते. येथे बाजरीचे उत्पादन 14.02 टक्के होते. त्यामुळे बाजरी उत्पादनात कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Bajari Production | Agrowon

महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक

बाजरी हे अतिशय फायदेशीर धान्य असून उत्पादनाच्या बाबतीत, महाराष्ट्रात 13.09 टक्के बाजरीचे उत्पादन होते. त्यामुळे कर्नाटक पाठोपाठ बाजरीचे उत्पादन सर्वाधिक येथे घेतले जाते. त्यामुळे महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो

Bajari Production | Agrowon

उत्तर प्रदेश

बाजरीची भाकर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये प्रथिने, फायबर आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. बाजरीच्या उत्पादनात उत्तर प्रदेश चौथ्या क्रमांकावर आहे. येथे दरवर्षी १२.०७ टक्के कापूस उत्पादन होते.

Bajari Production | Agrowon

हरियाणा

कृषी राज्य मंडळाच्या आकडेवारीनुसार, हरियाणा बाजरीच्या उत्पादनात पाचव्या स्थानावर आहे. येथील शेतकरी दरवर्षी ७.०६ टक्के बाजरीचे उत्पादन घेतात.

Bajari Production | Agrowon

Masoor Import Duty : मसूरच्या आयात धोरणाला केंद्राची मुदतवाढ, शेतकऱ्यांना फटका

आणखी पाहा