Anuradha Vipat
आपल्या रोजच्या जगण्यातल्या काही छोट्या आणि नकळत होणाऱ्या सवयी वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार घरावर मोठे संकट किंवा दारिद्र्य आणू शकतात.
घरात सुख, समृद्धी आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी या वाईट सवयी आजपासूनच बदलणे गरजेचे आहे.
चपलांचा ढीग किंवा पसारा असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. चपला नेहमी बाजूला आणि व्यवस्थित ठेवाव्यात.
रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात खरकटी भांडी तशीच ठेवून झोपल्याने अन्नपूर्णा देवी आणि लक्ष्मी माता नाराज होते.
वास्तूशास्त्रानुसार घरात सुकलेली किंवा कोमेजलेली झाडे नकारात्मकता पसरवतात.
छतावर जुने, तुटलेले साहित्य आणि भंगार साठवून ठेवल्याने घरात 'राहु' आणि 'शनी' चा दोष वाढतो.
घरातून पाणी वाया जाणे म्हणजे थेट पैशांचा अपव्यय होणे मानले जाते.