Poultry Farming : परसबागेतील कुक्कुटपालन अन् आर्थिक हातभार

Aslam Abdul Shanedivan

पुरक व्यवसाय

ग्रामिण भागात मुख्य व्यवसाय हा शेती असल्यातरिही अनेक गावात त्याला पुरक व्यवसाय म्हणून दुध आणि कुक्कुटपालन केलं जातं. याच्यामुळे आर्थिक हातभाराबरोबरच सकस आहार देखील मिळतो.

Poultry Farming | Agrowon

मूळ उद्दिष्ट

परसबागेतील कुक्कुटपालनाचा मूळ उद्दिष्ट हा कमी खर्चात पिलांचे संगोपन करणे आहे. तर शेतकऱ्यांना योग्य काळजी घेतल्यास पिल्लांची मर होत नाही.

Poultry Farming | Agrowon

महाराष्ट्र शासनाची योजना

महाराष्ट्र शासनाने लहान स्तरावरील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची अडचण लक्षात घेऊन परसबागेतील कुक्कुटपालनास चालना देण्यासाठी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करता येतो.

Poultry Farming | Agrowon

योजनेचे दोन पर्याय

ही योजना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबविण्यात येते, तसेच ही योजना सर्वसाधारण गटातील सर्व लाभार्थींकरिता उपलब्ध असून योजनेत दोन पर्याय उपलब्ध आहेत. १) तलंगा गटवाटप २) ब) एकदिवसीय सुधारित कुक्कुट पक्ष्यांच्या पिलांचे गटवाटप

Poultry Farming | Agrowon

कुक्कुटपालनातून उत्पन्नाचा स्रोत

कोंबड्यांचे रोग व्यवस्थापन व आहार व्यवस्थापन शास्त्रीयदृष्ट्या केल्यास परसबागेतील कुक्कुटपालनातून एक चांगल्या प्रकारचा उत्पन्नाचा स्रोत शेतकऱ्यांना उपलब्ध होतो.

Poultry Farming | Agrowon

राष्ट्रीय कृषी विकास योजना

परसातील कुक्कुटपालनास उपयुक्त अशा केंद्रीय पक्षी अनुसंधान केंद्र, बरेली या संस्थेच्या मान्यताप्राप्त गिरिराज, वनराज, कडकनाथ इत्यादी जातीच्या पिलांची निर्मिती लहान व मध्यम शेतकऱ्यास त्यांच्या ठिकाणीच करणे शक्य व्हावे, याकरिता महिला बचत गट/ वैयक्तिक लाभार्थीस या योजनेअंतर्गत हॅचर कम सेटर संयंत्रांचे अनुदानावर वाटप करण्यात येते.

Poultry Farming | Agrowon

शासकीय अनुदान

योजनेतून खुल्या प्रवर्गातील लाभार्थींना प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के मर्यादेत शासकीय अनुदान देण्यात येते, तर अनुसूचित जाती/ जमातीच्या लाभार्थींना प्रकल्प खर्चाच्या ७५ टक्के मर्यादेपर्यंत शासकीय अनुदान मिळते.

Poultry Farming | Agrowon
Agricultural Mortgage Scheme | Agrowon
आणखी पाहा