Anuradha Vipat
२-३ तुळशीची पाने स्वच्छ धुवून त्याचा रस मधाच्या किंवा गरम पाण्याच्या थेंबासोबत बाळाला चाखायला द्या.
बाळाला सर्दी झाल्यास लसूण आणि ओवा मोहरीच्या तेलात गरम करून थंड झाल्यावर छाती, पाठ आणि तळपायांना हलका मसाज करा.
बाळाला अपचन आणि गॅस झाल्यास अर्धा चमचा ओवा एका कप पाण्यात उकळून पाणी अर्धे झाल्यावर थंड करून बाळाला थोडे-थोडे द्या.
बाळाला अपचन आणि गॅस झाल्यास बाळाच्या पोटावर घड्याळाच्या दिशेने हळुवार मसाज करा.
झोपण्यापूर्वी कोमट तेलाने हलका मसाज केल्याने बाळ शांत झोपते.
त्वचेचा कोरडेपणा किंवा पुरळ उठल्यास त्यावर खोबरेल तेल लावणे फायदेशीर ठरते.
मेडिकलमध्ये मिळणारे सलाईन ड्रॉप्स नाकात टाकल्याने नाक मोकळे होते.