Anuradha Vipat
गाईचे तूप हे आरोग्यासाठी आयुर्वेदात 'अमृत' मानले गेले आहे.
गाईच्या तूपात ओमेगा-३, ओमेगा-९ फॅटी ॲसिड्स आणि जीवनसत्वे A, D, E, K मुबलक प्रमाणात असतात.
निरोगी शरीरासाठी रोज गाईचे तूप खाणे का गरजेचे आहे, याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत.
हे तूप पचनसंस्थेतील पाचक रसांचा स्राव वाढवते. ज्यामुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या मुळापासून दूर होतात.
तुपामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक घटक बाहेर काढतात.
व्हिटॅमिन 'K2' मुळे शरीर कॅल्शियम व्यवस्थित शोषून घेऊ शकते. यामुळे हाडे मजबूत होतात आणि हाडांचा ठिसूळपणा कमी होतो.
मानवी मेंदूचा जवळपास ६०% भाग फॅट्सने बनलेला असतो. गाईचे तूप मेंदूच्या पेशींना पोषण देते.