sandeep Shirguppe
आयुर्वेदात ‘दध्योऽथ नवनीतम्’ असा उल्लेख आपल्याला सापडतो, अर्थात दह्यापासून तयार झालेल्या लोण्याला नवनीत म्हटले जाते.
लोणी वृष्य (शरीरात वीर्य वाढविणारे), वर्ण्य (कांती सुधरविणारे), शरीरातील वेदना कमी करणारे म्हणून ओळखले जाते.
ओठ सतत फुटत असल्यास ओठांवर घरी बनविलेले साजूक लोणी लावावे.
लोणी व खडीसाखर हे मिश्रण रात्री घेतल्याने शरीरात वीर्यवृद्धी व्हायला मदत मिळते.
लोणी, नागकेशर चूर्ण व खडीसाखर यांचे मिश्रण घेतल्याने अर्शव्याधी कमी व्हायला मदत मिळते.
चेहऱ्याच्या त्वचेचे तेज वाढण्यासाठी लोण्यात थोडे केशर टाकून घेणे उत्तम ठरते.
गर्भारपणातील काही महिन्यांमध्ये आपण लोणी घ्यायला सल्ला देतो. या महिन्यांमध्ये लोणी पंचामृतानंतर घेणे त्वचेसाठी उत्तम ठरते.
ताकद वाढण्याच्या दृष्टीने लहान मुलांना लोणी व खडीसाखर हे मिश्रण वरचेवर देणे चांगले.