Swarali Pawar
लसीकरणामुळे जनावरांना घातक आजारांपासून संरक्षण मिळते. यामुळे उत्पादनक्षमता वाढते आणि जनावरांचे आयुष्य निरोगी राहते.
लस देण्याच्या आठवडाभर आधी जंतनाशक औषध द्यावे. जनावर आजारी नाही, ताप नाही आणि सशक्त आहे याची खात्री करावी.
गोचीड, उवा, पिसवा आणि गोमाश्या अशाPara कीटकांपासून जनावरांना मुक्त ठेवावे. यामुळे लस अधिक परिणामकारक ठरते.
लस नेहमी थंड ठिकाणी ठेवावी आणि कालबाह्य लस वापरू नये. सकाळी किंवा सायंकाळी थंड हवेतच लस द्यावी.
लसीकरणासाठी वापरण्यात येणारी सुई आणि सिरिंज उकळत्या पाण्यात निर्जंतुक करावी. कोणतेही रसायन वापरू नये आणि तयार लस लगेच वापरावी.
लसीकरणानंतर जनावरांना अति उष्ण किंवा थंड हवेत ठेवू नये. बैलांना आठवडाभर हलके काम द्यावे आणि गाठी आल्यास कोमट शेक द्यावा.
लस दिल्याने गाभण जनावरांना हानी पोहोचते हा चुकीचा समज आहे. खरं तर गाभण जनावरांना लस दिल्यास पिल्ले आजारांपासून सुरक्षित राहतात.
योग्य काळजी घेतल्यास लसीकरणामुळे जनावरांचे आरोग्य आणि उत्पादन दोन्ही सुधारते.
लसीकरण ही केवळ जबाबदारी नाही, तर पशुपालकांची एक महत्त्वाची सवय असावी!