Swarali Pawar
कोंबड्यांना पाण्यातून लस देणे सोपे असते. पण योग्य काळजी घेतली नाही तर लस परिणामकारक राहत नाही.
लसीकरणासाठी नेहमी स्वच्छ आणि थंड पाणी वापरा. पाणी गरम असेल तर बर्फ टाकून थंड करा.
लस देण्याच्या १ ते २ तास आधी पाणी देऊ नका. म्हणजे कोंबड्या लस मिसळलेले पाणी लगेच पितील.
लस मिसळण्यापूर्वी पाण्यात क्लोरिन किंवा इतर औषध नसावे. लस आणि इतर औषधे एकत्र केल्यास परिणाम कमी होतो.
पाणी देण्याची भांडी नीट घासून स्वच्छ करा. घाण किंवा विष्ठा राहिल्यास लस खराब होऊ शकते.
प्रति लिटर पाण्यात ३–५ ग्रॅम दूध पावडर मिसळा. यामुळे लस टिकून राहण्यास मदत होते.
लस मिसळलेले पाणी कोंबड्यांनी अर्ध्या ते एक तासात प्यायला हवे. जास्त वेळ ठेवल्यास लसीचा परिणाम कमी होतो.