Mistakes in Silage Making: मुरघास खराब होऊ नये म्हणून 'या' चुका टाळा!

Swarali Pawar

मुरघास खराब होतोय?

मुरघास तयार करताना थोडी जरी चूक झाली तरी तो कुजण्याचा धोका असतो. म्हणून कुट्टीपासून साठवणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर काळजी घ्या.

Avoid Silage Making Mistakes | Agrowon

चारा चुकीच्या वेळी कापू नका!

मका फुलोऱ्यावर किंवा दाणे चिकात असताना कापणी करावी. ज्वारी-बाजरी फुलोऱ्यात असताना कापल्यास मुरघासाची गुणवत्ता चांगली राहते.

Avoid Silage Making Mistakes | Agrowon

कुट्टी खूप मोठी ठेवू नका!

चाऱ्याची कुट्टी साधारण अर्धा ते पाऊन इंच आकाराची ठेवावी. कुट्टी मोठी असल्यास ती व्यवस्थित दाबता येत नाही आणि हवेमुळे मुरघास खराब होऊ शकतो.

Avoid Silage Making Mistakes | Agrowon

ओलावा जास्त ठेवू नका!

कुट्टीमध्ये साधारण ५० ते ६० टक्के आर्द्रता असणे योग्य आहे. कुट्टीतून पाणी ठिबकत असल्यास ती थोडी सुकवून घ्या.

Avoid Silage Making Mistakes | Agrowon

कुट्टीमध्ये हवा राहू देऊ नका!

मुरघास भरताना कुट्टीवर ट्रॅक्टर किंवा मजुरांच्या मदतीने चांगला दाब द्या. विशेषतः खड्ड्याच्या कडेला हवा राहणार नाही याची काळजी घ्या.

Avoid Silage Making Mistakes | Agrowon

खड्डा किंवा बॅग हवाबंद करा!

कुट्टी भरल्यानंतर खड्डा किंवा बंकर प्लास्टिकने पूर्णपणे झाकून घ्या. हवा किंवा पावसाचे पाणी आत गेल्यास मुरघास खराब होऊ शकतो.

Avoid Silage Making Mistakes | Agrowon

लवकर उघडू नका!

खड्डा भरल्यानंतर साधारण ७० ते ९० दिवस मुरघास तयार होण्यासाठी द्या. बॅग किंवा खड्डा वारंवार उघडल्यास हवा जाऊन मुरघासाची गुणवत्ता कमी होऊ शकते.

Avoid Silage Making Mistakes | Agrowon

खराब मुरघास

फिकट हिरवा किंवा सोनेरी तपकिरी रंग आणि आंबट-गोड वास असलेला मुरघास चांगला मानला जातो. काळा रंग किंवा कुबट वास जाणवत असल्यास असा मुरघास जनावरांना देऊ नका.

Avoid Silage Making Mistakes | Agrowon

Pest Management: हळदीवर कंदमाशी आणि कंदकुज रोखण्यासाठी करा हे उपाय!

अधिक माहितीसाठी...