Anuradha Vipat
दिवाळी हा दिव्यांचा, आनंदाचा आणि समृद्धीचा सण आहे. या काळात माता लक्ष्मीचे आगमन घरात व्हावे म्हणून आपण सर्वजण घराची सजावट आणि पूजा करतो.
वास्तू शास्त्रानुसार दिवाळीदरम्यान नकळत होणाऱ्या काही चुकांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.
घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर किंवा आजूबाजूला कधीही चपला-बूट, विशेषतः फाटलेले किंवा जुने बूट ठेवू नका.
मुख्य दरवाजावर लावलेले दिवे शांत आणि प्रसन्न असावेत.
घरात असलेली तुटलेली भांडी, तडे गेलेले आरसे, बंद पडलेली घड्याळे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू दिवाळीपूर्वीच घराबाहेर काढा.
घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कचरा किंवा जळमट साचू देऊ नका. घराची उत्तर-पूर्व दिशा ही देवांची दिशा मानली जाते.
दिवाळीच्या रात्री घराच्या दक्षिण दिशेला यमाचा दिवा लावला जातो. मात्र, लक्ष्मी पूजनाचे मुख्य दिवे दक्षिण दिशेला तोंड करून ठेवू नका.