Swarali Pawar
लम्पी हा गोवंश प्राण्यांना होणारा विषाणूजन्य त्वचेचा आजार आहे. यात ताप येतो, त्वचेवर गाठी होतात आणि दूध उत्पादन घटते.
हा आजार कॅप्रिपॉक्स विषाणूमुळे होतो, जो अत्यंत संसर्गजन्य असतो. तो डास, माश्या, गोचीड आणि दूषित साहित्यामुळे पसरतो.
जनावरांना उच्च ताप, मोठ्या वेदनादायक गाठी आणि जखमा, दूध उत्पादनात घट, आणि अशक्तपणा जाणवतो.
बाधित जनावरांच्या संपर्कातून, वाहतुकीतून आणि दूषित पाणी, चारा व दुषित उपकरणांमुळे आजार पसरतो.
दूध उत्पादन ३०-४० टक्क्यांनी कमी होते, कातडीवर जखमा होतात, बाजार व्यवहार थांबतो आणि जनावरांचा मृत्यूही होऊ शकतो.
बाधित जनावरांना वेगळे ठेवा, स्वच्छता राखा, डास- माशांचे नियंत्रण करा आणि जनावरांचे लसीकरण करा.
‘लम्पी प्रोवॅक’ ही स्वदेशी लस आजार नियंत्रणात प्रभावी ठरली आहे. याच्या समरूप लसींचा वापर जगभर केला जातो.
ताप, गाठी किंवा स्त्राव आढळल्यास त्वरित पशुधन अधिकारी किंवा पशुवैद्यक यांच्याशी संपर्क साधावा.