Kanda Sathwan Rog: कांदा काढल्यावर सडतोय? काजळी, ब्लू मोल्ड आणि मानेची सड रोग ओळखा वेळेत!

Swarali Pawar

कांदा सडतोय? कारण जाणून घ्या!

सध्या अवकाळी पाऊस आणि उष्णता वाढली आहे. यामुळे साठवलेल्या कांद्यामध्ये रोग वाढत आहेत.

Onion Storage Management | Agrowon

कांद्यावरचे रोग कोणते?

काजळी, ब्लू मोल्ड, मानेची सड आणि काळी बुरशी हे रोग दिसतात. हे रोग ओलसर आणि गरम हवामानात पटकन वाढतात.

Onion Storage Management | Agrowon

काजळी आणि ब्लू मोल्ड

काजळीमध्ये कांद्यावर काळा थर दिसतो. ब्लू मोल्डमध्ये निळी-हिरवी बुरशी येऊन कांदा सडतो.

Onion Storage Management | Agrowon

मानेची सड आणि काळी बुरशी

मानेची सड झाल्यावर कांदा आतून खराब होतो. काळी बुरशीमुळे कांद्यावर काळे ठिपके दिसतात.

Onion Storage Management | Agrowon

रोग का वाढतात?

काढणीदरम्यान झालेल्या जखमांमुळे रोग वाढतात. उष्ण आणि ओलसर वातावरण हे मुख्य कारण आहे.

Onion Storage Management | Agrowon

रोग टाळण्यासाठी काय कराल?

पीक फेरपालट करा आणि एकाच जमिनीत कांदा टाळा. काढणीपूर्वी योग्य फवारणी करणे खूप महत्त्वाचे आहे.

Onion Storage Management | Agrowon

योग्य काढणी कशी करावी?

५०-७०% माना पडल्यावरच कांदा काढा. काढणीनंतर चांगले वाळवूनच साठवण करा.

Onion Storage Management | Agrowon

साठवण करताना लक्षात ठेवा

चाळीत हवा खेळती ठेवा आणि खराब कांदा वेगळा करा. दर 1-2 महिन्यांनी तपासणी करून नुकसान टाळा.

Onion Storage Management | Agrowon

Santra Falgal: अवकाळीनंतर संत्रा-मोसंबीची फळगळ थांबवण्यासाठी ५ सोपे उपाय; तज्ज्ञांचा सल्ला

अधिक माहितीसाठी...