Onion Summer Storage: कांदा साठवताना नुकसान टाळा! कांदा चाळीची सोपी माहिती

Swarali Pawar

कांदा साठवताना चुकू नका!

रब्बी कांद्याची काढणी सुरू झाली आहे आणि पुढील काही महिने साठवण महत्त्वाची आहे. योग्य चाळ नसेल तर कांदा सडतो, कोंब येतो आणि वजनही घटते.

Onion Storage Tips | Agrowon

योग्य वातावरण का गरजेचे?

कांद्यासाठी २५ ते ३०°C तापमान आणि ६५ ते ७०% आर्द्रता योग्य असते. जास्त आर्द्रता असेल तर सडतो, कमी असेल तर वजन घटते.

Onion Storage Tips | Agrowon

दोन पाखी चाळ सर्वोत्तम

कांदा साठवण्यासाठी दोन पाखी चाळ अधिक उपयोगी ठरते. मधोमध मोकळी जागा असल्याने हवा खेळती राहते.

Onion Storage Tips | Agrowon

किती आकार असावा?

प्रत्येक पाखी ४ फूट रुंद आणि मध्यभागी ४ फूट मोकळी जागा ठेवा. उंची ८ फूट (मधोमध) आणि ६ फूट (बाजूने) ठेवावी.

Onion Storage Tips | Agrowon

जागा आणि दिशा महत्त्वाची

चाळ उंच आणि पाणी न साचणाऱ्या जागी बांधावी. दोन पाखी चाळ पूर्व-पश्चिम दिशेत उभारल्यास हवा चांगली फिरते.

Onion Storage Tips | Agrowon

छप्पर कसे असावे?

छप्पर उसाच्या पाचटाचे असेल तर तापमान कमी राहते. पत्रे वापरत असल्यास त्यावर पाचट टाकणे फायदेशीर ठरते.

Onion Storage Tips | Agrowon

या चुका महागात पडतात!

कांद्याचा ढिग ४ फूटांपेक्षा जास्त ठेवू नका, नाहीतर सडतो. पीव्हीसी पाइप ठेवल्यास गरम हवा बाहेर पडते.

Onion Storage Tips | Agrowon

छोट्या गोष्टींची काळजी

चाळीच्या जवळ जनावरं किंवा खतांची पोती ठेवू नका. यामुळे कांदा खराब होण्याचा धोका वाढतो.

Onion Storage Tips | Agrowon

Grassy Shoot Disease: उसात गवतासारखी वाढ दिसतेय? गवताळ वाढ रोगाची ही प्रमुख लक्षणे

अधिक माहितीसाठी...