Roshan Talape
पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते, त्यामुळे काही अन्न पदार्थ टाळणं आवश्यक आहे.
भजी, समोसे आणि वडा असे तळलेले पदार्थ पावसात टाळावेत. यामुळे पचन बिघडते आणि अॅसिडिटी वाढू शकते.
थंड पाणी किंवा सॉफ्ट ड्रिंक्समुळे घशाचा त्रास, सर्दी आणि ताप होण्याची शक्यता वाढते.
पावसाळ्यात अर्धवट शिजलेल्या मांसाहारात जीवाणू राहतात, त्यामुळे फक्त पूर्ण शिजवलेला मासाहार खावा.
रोडसाइड फास्टफूडमध्ये बरेच वेळेस स्वच्छतेचा अभाव असतो, त्यामुळे जंतुसंसर्गाची शक्यता वाढते.
पावसात आजारी न पडण्यासाठी नेहमी उकळलेले, गरम आणि स्वच्छ अन्नच सेवन करा.
उघडी ठेवलेली कापलेली फळं पावसात खराब होतात, त्यामुळे झाकलेली आणि स्वच्छ फळं खा.
पावसात दूध लवकर खराब होऊ शकतं, त्यामुळे ते नेहमी उकळूनच वापरा.