Roshan Talape
रताळं फायबरयुक्त असून उपवासात कटलेट म्हणून खाण्यास पौष्टिक आणि चविष्ट असते.
साबुदाणा, बटाटा आणि मिसळून केलेली थालीपीठ उपवासात चविष्ट आणि पोटभरीची असते.
वरीचे तांदूळ ग्लूटन फ्री असतात आणि उपवासासाठी योग्य पर्याय आहेत. त्यामध्ये ऊर्जा देणारे घटक भरपूर प्रमाणात असतात.
साबुदाणा, शेंगदाण्याचे कूट आणि बटाट्याचे मिश्रण हे उपवासासाठी ऊर्जा देणारे आणि पचनास सोपे असे हलके जेवण आहे.
राजगिऱ्यामध्ये लोह, कॅल्शियम आणि फायबर्स मुबलक असतात. हे पचनासाठी उपयुक्त असून उपवासात सत्वशक्ती प्रदान करतो.
शेंगदाण्याचे पीठ आणि बटाटा वापरून केलेले पिठल हे प्रथिनयुक्त आणि उर्जादायी असते. चवही उत्कृष्ट असते.
उपवासात दूध, बदाम, खजूर आणि अंजीर हे प्रथिने, कॅल्शियम आणि नैसर्गिक साखर देणारे उपयुक्त पदार्थ ठरतात.
उपवास करताना भरपूर पाणी प्यावे, साखरेचे सेवन मर्यादित ठेवावे आणि शक्यतो नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. यामुळे आरोग्य चांगले राहते आणि उपवास सुलभ होतो.