Mahesh Gaikwad
अॅव्होकॅडो हे एक विदेशी फळ असून याचे आरोग्यासाठी अगणित फायदे असतात.
अॅव्होकॅडोमध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच पोट साफ होते.
अॅव्होकॅडोमधील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स ह्रदयाचे आरोग्य सुधारण्यास फायदेशीर असतात.
यामध्ये ए, सी, ई, के आणि बी६ यासारखी जीवनसत्त्वे असतात. तसेच यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणत असतात.
यामध्ये असणारे हेल्दी फॅट्स आणि फायबर यामुळे पोट भरल्यासारखे राहते. परिणामी भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यास फायदा होतो.
अॅव्होकॅडोमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटामिन -ई मुबलक असतात. ज्यामुळे त्वचा चमकदार होते आणि केसही निरोगी राहतात.
यातील औषधी गुणधर्मांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजारांपासून शरीराचे संरक्षण होते.
दैनंदिन आहारात नियमित अॅव्होकॅडोचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक प्रकारे फायदे होतात.