Anuradha Vipat
हिवाळा सुरू झाला की गरमागरम आणि चमचमीत 'सरसो का साग आणि मक्के दी रोटी' खाण्याची मज्जा काही वेगळीच असते.
पोषक तत्वांनी भरपूर असलेला हा पंजाबचा पारंपरिक बेत थंडीच्या दिवसांत शरीराला उबदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो.
मोहरीची पाने ,पालक , बथुआ किंवा मेथी ,आले-लसूण पेस्ट ,हिरव्या मिरच्या,मक्याचे पीठ ,शुद्ध तूप,हिंग,कांदा ,टोमॅटो ,लाल तिखट, हळद आणि मीठ .
भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून कुकरमध्ये लसूण, आले, हिरवी मिरची आणि मीठ टाकून २-३ शिट्ट्या काढून शिजवून घ्या. भाज्या थंड झाल्यावर त्या मॅशरने चांगल्या घोटून घ्या. या भाज्यांमध्ये २ चमचे मक्याचे पीठ टाकून नीट मिक्स करा आणि मंद आचेवर ५-१० मिनिटे शिजवून घ्या.
एका कढईत भरपूर तूप गरम करा. त्यात हिंग, बारीक चिरलेला कांदा घालून तांबूस होईपर्यंत परता.आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून तूप सुटेपर्यंत परतून घ्या.आता यात शिजवलेला साग, थोडे लाल तिखट आणि हळद घाला. सर्व मिश्रण एकत्र करून मंद आचेवर ५ मिनिटे शिजवा.
मक्याचे पीठ ,कोमट पाणी ,ओवा,मीठ, तूप किंवा लोणी.
मक्याचे पीठ, ओवा आणि मीठ एकत्र करा. कोमट पाण्याचा वापर करून पीठ मऊ मळून घ्या. पोळपाटावर थोडे तूप लावून हलक्या हाताने लाटून गोल रोटी तयार करा. दोन्ही बाजूंनी सोनेरी ठिपके येईपर्यंत मध्यम आचेवर छान शेकून घ्या. गरम रोटीवर भरपूर तूप किंवा लोणी लावा