Anuradha Vipat
सकाळी उठल्यानंतर आपण ज्या गोष्टी करतो किंवा पाहतो, त्याचा आपल्या संपूर्ण दिवसावर आणि मानसिकतेवर खूप मोठा प्रभाव पडतो.
वास्तू शास्त्रानुसार, सकाळच्या वेळी विशिष्ट नियमांचे पालन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख, समृद्धी तसेच सकारात्मकता राहते.
सकाळी डोळे उघडल्या उघडल्या सर्वात आधी कोणाचाही चेहरा न पाहता आपल्या दोन्ही हातांच्या तळहातांचे दर्शन घ्यावे आणि "कराग्रे वसते लक्ष्मी..." हा श्लोक म्हणावा.
पलंगावरून खाली पाऊल ठेवण्यापूर्वी जमिनीला उजव्या हाताने स्पर्श करून धरणी मातेची क्षमा मागावी व नमस्कार करावा.
घराचा मुख्य दरवाजा आणि खिडक्या सकाळी लवकर उघडाव्यात, जेणेकरून ताजी हवा आणि सूर्याचा पहिला प्रकाश घरात येईल.
सकाळी लवकर अंघोळ किंवा हात-पाय धुवून घराच्या मुख्य दाराबाहेर स्वच्छ पाणी किंवा हळदीचे पाणी शिंपडावे.
वास्तू आणि ज्योतिष शास्त्रानुसार, वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरु ग्रह मजबूत होतात, ज्यामुळे कामात यश मिळते.