Anuradha Vipat
महत्त्वाच्या कामासाठी किंवा रोज घरातून बाहेर पडताना काही सोप्या आध्यात्मिक टिप्स पाळल्यास कामात यश मिळण्याची शक्यता वाढते
बाहेर जाताना पाण्याचा भरलेला तांब्या किंवा पाण्याचे भांडे पाहून बाहेर पडणे शुभ मानले जाते.
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल, तर थोडासा गूळ आणि पाणी पिऊन घराबाहेर पडावे.
बाहेर जाताना दही-साखर खाणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
उंबरठा ओलांडताना नेहमी आधी उजवा पाय बाहेर टाकावा.
घरातून निघण्यापूर्वी आपल्या कुलदैवताचे स्मरण करून त्यांना नमस्कार करावा.
आरशात स्वतःचा चेहरा पाहून स्मितहास्य करा आणि मग बाहेर पडा.