Anuradha Vipat
अस्सल गावरान वांग्याच्या भाजीसाठी, वांगे धुवून, चार तुकडे करून घ्या
४-५ ताजी वांगी , १/२ वाटी शेंगदाणा कूट, १/४ वाटी सुके खोबरे, ७-८ लसूण पाकळ्या, २-३ हिरवी मिरची, १/२ चमचा जिरे, कोथिंबीर, मीठ, कांदा लसूण मसाला, हळद, हिंग, धणे पूड, ३ चमचे तेल, मोहरी, जिरे आणि पाणी.
वांगी स्वच्छ धुवा आणि त्यांची देठं काढून चार भागांमध्ये कापून घ्या.
एका भांड्यात शेंगदाणा कूट, किसलेले खोबरे, लसूण पेस्ट, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेऊन मिश्रण तयार करा. हे मिश्रण वांग्यांच्या फोडींमध्ये भरा.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे घालून त्यानंतर हिंग, हळद, धणे पूड आणि कांदा-लसूण मसाला घालून थोडा वेळ परतून घ्या.
आता वांगी या मसाल्यात घालून मंद आचेवर चांगली परतून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून भाजी झाकून शिजवून घ्या
आता अस्सल गावरान वांग्याची भाजी तयार आहे.