Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रह हा सुख, समृद्धी, ज्ञान, विवाह आणि नशिबाचा कारक मानला जातो.
कुंडलीत गुरु ग्रह कमकुवत असल्यास कामात अडथळे येणे, विवाहातील विलंब किंवा आर्थिक टंचाई अशा समस्या जाणवतात.
दिवाळीच्या अत्यंत पवित्र मुहूर्तावर केळीच्या झाडाचा हा विशेष उपाय केल्याने गुरु ग्रह मजबूत होतो आणि घरात भगवान विष्णू व लक्ष्मीची अखंड कृपा राहते.
हा उपाय दिवाळीच्या ५ दिवसांपैकी कोणत्याही गुरुवारी किंवा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी करणे अत्यंत शुभ मानले जाते.
सकाळी लवकर स्नान उरकून पिवळे वस्त्र परिधान करावे. घराच्या जवळ असलेल्या किंवा मंदिरात असलेल्या केळीच्या झाडाची स्वच्छ पाण्याचा शिडकावा करून पूजा करावी.
पितळेच्या पात्रात स्वच्छ पाणी घ्या. त्यात एक चिमूटभर हळद, थोडे गंगाजल आणि थोडे दूध मिक्स करा. हे पाणी 'ॐ बृहस्पतये नमः' किंवा 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करत केळीच्या मुळाशी अर्पण करा.
केळीच्या झाडाला हळदीचा टिळा लावा. त्यानंतर पिवळी फुले, चण्याची डाळ आणि गुळाचा तुकडा झाडाजवळ अर्पण करावा.