Bambu Samriddhi Yojana : अटल बांबू समृद्धी योजना शेतकऱ्यांना करतीय कंगाल?

sandeep Shirguppe

अटल बांबू समृद्धी योजना

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अटल बांबू समृद्धी योजना राबवली जात आहे.

Bambu Samriddhi Yojana | agrowon

शेतकऱ्यांचा प्रतिसाद

या योजनेला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला मात्र, पूर्वी लागवड केलेल्या बांबूला बाजारपेठ नाही.

Bambu Samriddhi Yojana | agrowon

बांबूला मागणी नाही

लोखंडाच्या वापरामुळे बांबूला मागणी नसल्याने संबंधित शेतकऱ्यांवर कंगाल होण्याची वेळ आली आहे.

Bambu Samriddhi Yojana | agrowon

बांबू शेतीला प्रोत्साहन

बांबू शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी बांबू समृद्धी योजनेचे अनुदान वाढवले आहे. वन आणि सामाजिक वनीकरण विभाग याची अंमलबजावणी करीत आहे.

Bambu Samriddhi Yojana | agrowon

लाभाचे अमिष

शासकीय अधिकारी आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भविष्यातील लाभाचे आमिष दाखवून बांबू लागवड करण्यास सांगत आहेत.

Bambu Samriddhi Yojana | agrowon

जळावू लाकडाची किंमत

सध्या बांबूला बाजारपेठ नसल्याने जळावू लाकडाच्या किमतीमध्ये बांबू खरेदी केली जात आहे.

Bambu Samriddhi Yojana | agrowon

वाहतुकीचा खर्च अंगावर

वाहतुकीचा खर्चही पदरने देण्याची वेळ आल्याने नव्याने बांबू लागवड करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

Bambu Samriddhi Yojana | agrowon

बांबूपासून फर्निचर

बांबूपासून फर्निचर, बांबू पल्प, बांबू मॅट बोर्ड, कार्टेज इंडस्ट्री, प्लायबोर्ड बनवता येते. मात्र, हे तयार करणाऱ्या कारागिरांची मजुरी वाढली आहे.

Bambu Samriddhi Yojana | agrowon

काय आहे बांबू समृद्धी योजना ?

बांबू समृद्धी योजनेंतर्गत लागवड केलेल्या एका रोपास तीन वर्षांसाठी ३५० रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील पन्नास टक्के अनुदान म्हणून शासनाकडून दिले जाते.

Bambu Samriddhi Yojana | agrowon