Anuradha Vipat
ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्र आणि शकुन शास्त्रानुसार, घरात श्रीमंती किंवा धन-समृद्धी येण्यापूर्वी काही शुभ संकेत किंवा लक्षणे दिसू लागतात
घरात अचानक भांडणे कमी होऊन शांतता आणि प्रेम वाढू लागल्यास, हे आर्थिक समृद्धीचे शुभ लक्षण मानले जाते.
घरातील सदस्यांच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायात अचानक प्रगती होऊ लागते आणि अडथळे दूर होतात.
घराच्या छतावर किंवा बाल्कनीत पांढरा हंस किंवा मोर दिसणे अत्यंत शुभ मानले जाते.
घरातील तुळशीचे रोप अचानक हिरवेगार, ताजेतवाने आणि बहरलेले दिसू लागल्यास घरात लक्ष्मीचे आगमन होणार असल्याचे ते लक्षण असते.
स्वप्नात हिरवेगार निसर्ग, पाणी, मासे, लक्ष्मी देवी किंवा सोन्यासारख्या वस्तू दिसल्यास नजीकच्या काळात धनलाभ होण्याची शक्यता असते.
अचानक गहाळ झालेले पैसे सापडणे किंवा कुणीतरी उसने घेतलेले पैसे अनपेक्षितपणे परत करणे.